महाडमधील शिवकालीन विरेश्वर मंदीरात महाशिवरात्रीला प्रारंभ… हर हर महादेव गर्जना…

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

           दक्षिण रायगडमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. दक्षिण काशी म्हणुन प्रसिध्द असलेल्या श्रीक्षेत्र हरीहरेश्वर, महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराज ठिकाणी शंकर मंदीरांमध्ये पहाटेपासुनच विधीवत पुजा अभिषेक प्रारंभ झाले आहेत.  महाशिवरात्रीच्या निमित्ताने “”हर हर महादेव गर्जना करीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाड तालुक्यातील माझेरी, बिरवाडी मल्लिका अर्जुन मंदिर  आदी ठिकाणी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाडमधील शिवकालीन विरेश्वर मंदीरात आजपासुन पाच दिवस छबिना उत्सव म्हणजे जत्रे ला प्रारंभ होतो आहे.