पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
मी पुण्याची स्थानिक आहे… माझे गुंडांशी संबंध आहेत… सामाजिक प्रतिष्ठान आणि फाऊंडेन्शच्या माध्यमातून आम्ही काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करतो… असा नुकताच आम्ही ९ कोटींचा व्यवहार केला आहे… त्यातील ४० ते ५० लाख तुझ्या नवऱ्याला देऊ… फक्त त्याबदल्यात तू परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेव… हा कारनामा आहे… पुण्याच्या महिला पोलीस हवालदारनीचा… त्यामळे हा कारनामा करणारी अनघा ढवळे लेडी पोलीस आहे की, लेडी डॉन…? असा सवाल पुणेकरांसह अवघ्या महाराष्ट्राचा आहे… मित्राच्या बायकोवर ही लेडी पोलीस महिला वारंवार दबाव आणत होती… याप्रकरणी पुणे पोलीस दल पूर्णतः बदनाम झाले असून पोलीस आयुक्तांनी अनघा ढवळे या महिला पोलिसला तातडीने निलंबित केले आहे… महिला पोलीस असलेल्या अनघा ढवळेने मित्राच्या बायकोला आणि तिच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती… अनघा ढवळे ही सोशल मीडियावरही जोरदारपणे कार्यरत होती… तिचे अनेक स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात… तसेच साडीतील फोटो असलेल्या सामाजिक प्रतिष्ठान आणि फाऊंडेन्शच्या नावाच्या शुभेच्छा जाहिरातीही आढळतात… सध्या ही लेडी पोलीस निलंबित असून तिला बडतर्फ करून तिच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे…