दापोडे गावानजीक एसटी व सेलेरो कारचा अपघात…एसटी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला चेंडूसारखी पलटी…

0
109

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-

पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस व सेलेरो कारचा भीषण अपघात झाला…एसटी बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते…एसटी बस कर्जत खोपोली मार्गे माणगावकडे जात होती…तर सेलेरो पाली बाजूकडून खोपोलीकडे जात होती…हा अपघात इतका भीषण होता की एसटी बस विद्यार्थ्यांसहित पलटी झाली…मागील काच फोडून 48 एनसीसी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले…या अपघातात सेलेरोमधील डॉ आयुष गायकवाड व विशाल पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलविण्यात आले… तात्काळ पाली पोलीस व स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले…