नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळूंके):-
सध्या वातावरण बदलामुळे सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक उन्ह असे चित्र शहरात दिसत आहे. या विषम हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार वाढत आहेत. हे आजार संसर्गजन्य असल्याने त्यांचा लहान मुलांमध्ये लगेचच प्रसार होताना दिसत आहे. या संसर्गजन्य आजारात ताप सौम्य प्रकारचा असतो. मात्र, तापाकडे वेळेत लक्ष न दिल्यास मुलांमध्ये फ्ल्यू व न्यूमोनियासारखे आजारांचाही धोका उद्भवतो…नेरळ शहरात डेंगू सदृश्य ताप प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे…अगदी तान्ह्या बालकांपासून ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वायरल आजार पसरत आहे…या आजारांमध्ये पहिले काही दिवस सांधेदुखी व थकवा, पुरळ येणे यासोबतच तीव्र ताप येणे ही लक्षणे दिसून येतात…नेरळ येथील खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे तीन रुग्ण दाखल झाले आहे…त्यातील एका बालकाला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे…तर दोघांवर सध्या उपचार सुरु आहे… याआधी देखील कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील उच्चशिक्षित तरुणाचा डेंग्यूने बळी घेतला होता…एवढे होऊन देखील नेरळ प्रशासनामार्फत धूर व औषध फवारणी केली जात नाही…असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत…याआधी देखील मोहसीन मार्केट लस्सी गल्ली शेजारी असलेली गटारे तुडुंब भरली होती…या संदर्भात नेरळ ग्रामपंचायतमध्ये तक्रार सुद्धा देण्यात आली होती…मात्र ग्रामपंचायतने यावर कोणतीही पाऊले न उचलल्याने नेरळ शहरातील दोन रुग्ण डेंग्यूच्या आजाराने त्रस्त झाली आहेत…