सागर राजेंद्र देशमुख यांची ग्रामपंचायत तर देशमुख कांबळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड…

0
134

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

         महाड तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या 134 ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत देशमुख कांबळे येथे बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सरपंच सुनील भाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे सदस्य श्री सागर राजेंद्र देशमुख यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली…या निवडी दरम्यान पीठासन अधिकारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री बंडगर यांनी सुद्धा उपसरपंच सागर राजेंद्र देशमुख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…सागर राजेंद्र देशमुख यांची देशमुख कांबळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड होताच सर्व राजकीय पक्षातील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या…