रायगड शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
रायगड जिल्ह्यातील विविध विभागात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले…शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साहाय्याने सापळा रचून दुसऱ्या शिक्षकाला जेलची हवा दाखवल्याने पवित्र अशा शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे…खालापूर तालुक्यातील तीन शिक्षक व तक्रारदार शिक्षक अशा चौघांनी आपले वेतन निघण्याकरता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयाकडून जून व जुलै या कालावधीत जिल्हा परिषद कार्यालयात हजर असल्याबाबतचा दाखला व जून,जुलै या महिन्याचे वेतन अदा करण्याकरिता जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांचे आदेश होण्याकरिता आरोपी लोकसेवक अमित पंड्या यांना विनंती करून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून चाळीस हजार रूपयांची लाचेची मागणी ४ सप्टेंबर २०२४ तारखेला केली होती…आरोपी अमित राजेश पंड्या,वय ४७ वर्षे हा पनवेल तालुक्यात शिक्षक आहे…सद्या शालार्थ समन्वयक असून त्यांची नेमणूक जिल्हा परिषद रायगड येथे आहे…४ सप्टेंबर रोजी पनवेल एसटी स्टँड येथे लाच स्वीकारणार होता, पण सापळा रचल्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही…त्यामुळे सापळा रद्द करण्यात आला होता.पण १८ सप्टेंबर रोजी खालापूर फाटा येथे लाच घेण्याचे कबूल केल्याने पोलीस उपअधिक्षक(लाचलुचपत) शशिकांत पाडावे, सफौ.अरुण करकरे, पोह.महेश पाटील, पोना.सचिन आटपाडकर, सागर पाटील यांनी पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे ला.प्र.वी. ठाणे परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अमित पंड्या याला रक्कम रुपये चाळीस हजार तक्रारदार यांच्याकडून खालापूर फाटा या ठिकाणी लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले…एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला लाच स्वीकारताना पकडुन देणे म्हणजे शिक्षण क्षेत्रातील पवित्र शिक्षव्यवस्थेतील भ्रष्टाचार उघड होत असून अशा प्रकारचे किती गुन्हेगार लपून बसले आहेत? याचा छडा शिक्षण अधिकारी लावणार आहेत का?अनेक शिक्षक दररोज तालुका शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात दिवसभर बसलेले पाहण्यास मिळतात…यांचेही कारण विद्यार्थी पालक यांना कळले पाहिजे,अशी मागणी पुढे येण्यास वेळ लागणार नाही…
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन केले आहे…