उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
देशात, राज्यात, शहरात, गावात जातीत आणि धर्मात भांडणे लावणाऱ्या भाजपाविरोधात बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी काँग्रेसने उरण विधानसभा मतदारसंघात एल्गार केला… भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गावकमिटी नामफलक अनावरण सोहळ्याप्रसंगी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले… या नामफलक अनावरण सोहळ्याने काँग्रेसच्या गावोगावी असलेल्या शाखांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली… उरण तालुका काँग्रेस कमिटी, उरण विधानसभा युवक काँग्रेस कमिटी, उरण तालुका महिला काँग्रेस कमिटी झटून कामाला लागली होती… भेंडखळ, सोनारी, फुंडे, पागोटे, नवघर, जसखार आणि द्रोणागिरी शहर येथे काँग्रेस कमिटीच्या नामफलकांचे अनावरण झाले… भेंडखळ येथील अनावरण कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार आणि उरणचे पुढील आमदार काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत असतील असे जाहीर केले…त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला… जोरदार घोषणाबाजी केली… भेंडखळच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली… भेंडखळ नामफलकाच्या अनावरणानंतर दुचाकीवरून काँग्रेसने विधानसभा मतदारसंघ पिंजला… या रॅलीचे सार्थ्य स्वतः दुचाकी चालवत महेंद्रशेठ घरत यांनी केले… शेवटचे नामफलकाचे अनावरण द्रोणागिरी नोड येथे झाले… या सोहळ्यात बोलताना महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचा इतिहास सांगितला… काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा, जुना आणि पहिला राजकीय पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले… महेंद्रशेठ यांनी यावेळी मोठ्या आदराने उरणचे लढाऊ नेते गोपाळ पाटील यांचे नाव घेतले… तसेच कार्यकर्त्यांना लोकांची सेवा करण्याचे आदेश दिले… यावेळी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे, मिलिंद पाडगावकर, जे.डी.जोशी, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष किरीट पाटील, ओबीसी सेलचे वैभव पाटील, विभागीय नेते वायटूके उर्फ यशवंत म्हात्रे, महिला नेत्या रेखा घरत, महेंद्र ठाकूर, डॉ. मनीष पाटील, नरेश म्हात्रे, लंकेश ठाकूर, दीपक ठाकूर, अजित ठाकूर, श्रेयश घरत, गाव अध्यक्ष प्रमोद ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…