Friday, November 22, 2024
Homekokanशेतकरी आणि गोरगरिबांचे वकील म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. संदिप ढवळ यांना क्रांतीसूर्य...

शेतकरी आणि गोरगरिबांचे वकील म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. संदिप ढवळ यांना क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार प्रदान

लांजा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

                    शाहिरी माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या श्री गुरू सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या लांजा शाखेच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार शेतकरी आणि गोरगरिबांचे वकील,सामाजिक कार्यकर्ते व श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट रत्नागिरी (सर्वोदय छात्रालय) चे अध्यक्ष ॲड. संदिप ढवळ यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. म्हेत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

             लांजा शाखेच्यावतीने गौरव पुरस्कार २०२४ प्रदानाचा  हा कार्यक्रम लांजा येथील कुलकर्णी – काळे छात्रालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला  प्रमुख मान्यवर म्हणून राज्य संस्थेचे पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर हिंदूराव लोंढे, शाहीर गुलाबराव मुल्ला, निवड समितीच्या अध्यक्षा शाहीर चित्रा पाटील, लांजा शाखेचे अध्यक्ष काशिराम जाधव,  गंगाराम हरमले, माजी जिल्हा परिषद सदस्य चांद खान, मोहन घडशी , शक्ती तुरा मंडळाचे लांजा शाखेचे अध्यक्ष श्री.पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            या कार्यक्रमात बोलताना गटविकास अधिकारी श्री. म्हेत्रे यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली असल्याचे मत व्यक्त केले. ॲड. संदिप ढवळ हे पेशाने वकील असले तरी कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांमध्ये करत असलेले सामाजिक काम पाहिलेले आहे. त्यांच्या पुर्ण कुटुंबाशी माझी ओळख आहे. विशेषतः कुळ कायद्यासंदर्भातील त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर सध्या ते श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट रत्नागिरीच्या ( सर्वोदय छात्रालय) अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. तसेच सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे येणाऱ्या अनेक गरजू पेशंटना त्यांचा सर्वतोपरी मदतीचा हात असतो. त्यामुळे योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाला आहे असे प्रतिपादन केले.

                शाहीर हिंदूराव लोंढे व शाहीर गुलाबराव मुल्ला यांनी मनोगत व्यक्त करताना मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर समाजप्रबोधन केले पाहिजे. तसेच बदलत्या काळात प्रबोधनातही बदल घडवून आणले पाहिजेत असे मत व्यक्त केले. ॲड. संदिप ढवळ यांनी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ऋण व्यक्त केले व यापुढेही सामाजिक कार्याचा वसा सुरू राहील असे सांगितले.
या कार्यक्रमात विविध कला क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त रत्नांचा गौरव करण्यात आला…त्यामध्ये विश्वनाथन गंगाराम हरमले, सौ. संध्या तानाजी वाडेकर, बळीराम श्रीपत दळवी, मारूती भाऊ मुगुटराव, विद्याताई संदिप देवकर, महादेव कृष्णा पन्हळेकर, कविराज काशिराम जाधव, मोहन अनाजी गुरव, सुर्यकांत पांडुरंग गोरूले, मधुकर नरहरी अधटराव, ह.भ.प. रामदास नामे महाराज, सुभाष लुकाजी मोसमकर, वेदांत सुर्यकांत गोरूले यांचा समावेश होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.  हरमले गुरूजी यांनी तर सूत्रसंचालन  काशिराम जाधव, कविराज जाधव यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments