जनावरांच्या गळ्यात मनसेने बांधले लाईटचे दोरखंड…जनावरांचे अपघात रोखण्यासाठी मनसेचा उपक्रम…

0
91

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुक्या जनावरांचे अनेक अपघात होतात…रात्रीच्या अंधारात ही जनावरे  महामार्गावर बसत असल्याने अनेक वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही… त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेय. हीच बाब लक्षात घेत मनसेने  पहाटे अशा मोकाट जनावरांना रेडियम लाईट असलेले बेल्ट बांधण्याचा पुढाकार घेतला… यामुळे ही जनावरे वाहनचालकांना आता अंधारात स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे.  याकामी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी विशेष पुढाकार घेतलाय. मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतेय.