Saturday, November 23, 2024
Homeधार्मिकसाखर चौथीच्या गणपती बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात... उरणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती विराजमान...

साखर चौथीच्या गणपती बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात… उरणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती विराजमान…

उरण शिवसत्ता टाइम्स (विठ्ठल ममताबादे): 

अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर आता लगबग सुरू झाली ती साखरचौथ गणपतीची…साखर चौथीच्या गणरायाच्या उत्सवाची सुरुवात पेण, उरण, पनवेलमधील आगरी व इतर समाजात गेल्या दशकापासून सुरु आहे…कित्येक घरांमध्ये साखर चौथ गणपती विराजमान झाले आहेत. दीड दिवसाचा हा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे आगरी कोळी बांधव या साखरचौथ गणपतीच्या विसर्जनानंतर मच्छीमारासाठी समुद्रामध्ये जातात आणि आपला व्यवसाय सुरू करतात…
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत(वाडी) उरण शहर, कामठा रोड येथे विराजमान झालाय…यावर्षी वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे कामगार वसाहत वाडी उरण शहर येथे भव्य दिव्य असे जेजुरीच्या खंडेरायाचे प्रतिकृती गणेशोत्सव निमित्त साकारण्यात आली  आहे. येथील गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे. मूर्तिकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक व आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. जेजुरीचे  प्रतिकृती बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यंदाचे गणेशोत्सव साजरे करण्याचे हे चौथे वर्ष आहे. यंदाचा उत्सव शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान आहे…या दरम्यान संघटनेच्यावतीने विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक ओमकार घरत, अध्यक्ष तेजस म्हात्रे, उपाध्यक्ष मयूर केकातपुरे व वादन एक कलाचा राजा या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments