Sunday, November 24, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडलोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा रयतच्यावतीने गौरव... विद्यमान शैक्षणिक वर्षात ७ कोटी ११...

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा रयतच्यावतीने गौरव… विद्यमान शैक्षणिक वर्षात ७ कोटी ११ लाख रुपयांची देणगी… 

सातारा शिवसत्ता टाइम्स (हरेश साठे):- 

कर्तृत्व, दातृत्व, सामाजिक बांधिलकी असलेले आणि समाजकारणाला महत्व देत सामाजिक दायित्व पार पाडणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला ७ कोटी ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे, त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (दि. २२) कर्मवीर जयंतीनिमित्त समारंभपूर्वक हृद्य गौरव करण्यात आला.

बहुजनांच्या शिक्षणाचे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा सातारा येथे कर्मवीर भूमीत अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला.
थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत १०० कोटीहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे अखंड कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर करत आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विधायक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी मुक्तहस्ते मदत केली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यालयांना उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे. विद्यमान शैक्षणिक वर्षात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २ कोटी ६५ लाख रुपये, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी ३ कोटी ९१ लाख रुपये तर सुपुत्र परेश ठाकूर यांनी ५५ लाख रुपयांची देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे, त्याबद्दल त्यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.तसेच सात्रल विद्यालयाच्या विकासासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शाखेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.
चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात. शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वानी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे आणि याच सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबिय कार्य करीत असतात. रयत आणि ठाकूर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.  तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत.  स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था हि शैक्षणिक संस्था असतानाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे रयत शिक्षण संस्थेवर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झाले आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था माणून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण देशात आदर्श घालून दिला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे संस्थेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा कायम राहिला आहे. त्यामुळे संस्थेचे आधारस्तंभ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा सन्मान करून त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ.अनिल पाटील, व्हाइस चेअरमन भगीरथ शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू – पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार बाळसाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, वैशाली देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, शुभांगी घरत, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, यांच्यासह मॅनेजिंग कौन्सिल व जनरल बॉडी सदस्य, रयत सेवक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत सेवकांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या कार्याचा आणि पुढील वाटचालीचा आढावा मांडला.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गव्हाण येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयाने यंदाचा कर्मवीर पारितोषिक पटकावला असून, त्यांचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments