मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली… तसेच आगामी महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल पद भूषविलेले आणि एकेकाळी भाजपाशी संबंधित असलेल्या सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी या भेटीनंतर दिली.उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत भाजपाला नुसताच फटका बसणार नाही तर या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर मलिक यांनी जोरदार टीका केली… महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यादरम्यान ही लढाई होणार आहे.