रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो म्हणजे गणेश उत्सव… कोकणात लाडक्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा दीड, पाच, दहा दिवसांच्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सुद्धा उत्साहात संपन्न झाला… त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात साखरचौथ गणपती बाप्पाची विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. रोह्यातील भुवनेश्वरचा राजा , दमखडीचा राजा, धनगर आळीचा राजा, वाडकरांचा राजा, पडवळ यांचा राजा, अशा विविध गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झाले…यावेळी रोहेकर डॉल्बीच्या तालावर ठेका धरत जल्लोष करताना पाहायला मिळाले. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या उत्साहात जयघोष करून बाप्पाचा रोहेकरांनी निरोप घेतला…