Monday, November 25, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडहुतात्मा स्मारकात २ वर्षे बांधकाम साहित्य... अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची...

हुतात्मा स्मारकात २ वर्षे बांधकाम साहित्य… अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

उरण शिवसत्ता टाइम्स (विठ्ठल ममताबादे):-  

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकात अशोक शेडगे  या व्यक्तीने जल जिवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेल्या २ वर्षांपासून ठेवले आहे… सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही… सदरचे हुतात्मा स्मारक  पाणदिवे गावाचे मंदिर, प्रेरणास्थान आहे… या प्रेरणास्थानाचे गोडावूनमध्ये रूपांतर करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे… या व्यक्तीला ग्रामस्थांकडून वारंवार सुचना दिल्या गेल्या आहेत… तरीही सदर व्यक्ती साहित्य काढत नाही… अशी माहिती पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलला दिली…          हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली आहे. हुतात्मा स्मारक हे देशाचे प्रतीक आहे… देशाचा महत्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे… अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टींसाठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे… त्यामुळे सदर व्यक्ती विरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा… अशी मागणी नितेश पाटील यांची आहे… संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे २५ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच हुतात्मादिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम, पिरकोन ग्रामपंचायतीच्या  सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहारदेखील केला आहे…         याबाबत पत्रकारांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या मी बाहेर आहे. संबंधित विषया संदर्भात मी माहिती घेतो. आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देतो. चुकीचे काही असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल… असे सांगितले…         दरम्यान यासंदर्भात शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलतर्फे अशोक शेडगे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही… मात्र नेमकी वस्तुस्थिती काय आहे? याचे स्पष्टीकरण देऊन आपली बाजू उघड करावी अशी मागणी होत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments