उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या चाणजे ग्रामपंचायतीला सर्वांग सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे… येथे सफाई करताना सफाई कामगाराला नुकतेच अमेरिकन डॉलर सापडल्याची चर्चा आहे… अज्ञानामुळे कामगाराला डॉलरचे महत्त्व समजले नाही… त्याने सदरचे डॉलर हे गाव पातळीवरील पुढाऱ्याला दिले… पुढाऱ्याने डॉलर चांगलेच ओळखले… त्याचे डोळे पांढरे झाले… पुढाऱ्याने थातुर मातुर कारण सांगून कामगाराला वाटेला लावले… हे जुने टाकाऊ चलन असल्याचे कामगाराला सांगितले… त्यानंतर सदरचे डॉलर पुढाऱ्याने परस्पर वठविले… रुपयाच्या मानाने डॉलरची किंमत जास्त असल्याने पुढाऱ्याला मजबूत भारतीय पैसा मिळाला…
ग्रामपंचायत सफाई कामगाराला अमेरिकन डॉलर सापडल्याची वार्ता त्याच्या काही हितचिंतकांना समजली… त्यांनी सफाई कामगाराला डॉलरची किंमत सांगून सावध केले… सफाई कामगाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले… त्याने पैसे लाटणाऱ्या पुढाऱ्याची भेट घेऊन डॉलरबाबत विचारणा केली… यावर त्या पुढाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली…सफाई कामगाराला अमेरिकन डॉलर सापडल्याची वार्ता व्हॅटसपवर वायरल झाली आहे… याबाबत योग्य तो खुलासा झाला नाही तर याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात येणार असल्याची चर्चा आहे… त्यामुळे सध्या अमेरिकन डॉलर लाटणाऱ्या पुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहे…