नवी दिल्लीतील युनिटी ऑफ मूलनिवासी समाज कार्यक्रमात रत्नागिरीच्या सुपुत्राचा आवाज घुमला … सत्यशोधक अशोक भाटकर यांचे सखोल मार्गदर्शन …

0
78
नवी दिल्ली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
 

युनिटी  ऑफ मूलनिवासी समाज नवी दिल्ली या संघटनेचे पहिले  महाराष्ट्र राज्य अधिवेशन, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी पनवेल  येथे पार पडले…या अधिवेशनात बहुजनांचे राज्य पातळीवरील मुद्दे तसेच राष्ट्रीय पातळीवर, आणि समाजात वावरताना येणाऱ्या,  समस्या आणि त्यावर उपाय काय करावे, यावरती सखोल आणि अभ्यासू मार्गदर्शन कोकणचे सुपुत्र रत्नागिरीचे सत्यशोधक शिव ,फुले ,शाहू, आंबेडकर विचार -प्रचार, प्रसारक, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक भाटकर यांनी केले… 

         या अधिवेशनात भाटकर यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना का आवश्यक आहे ? ते शासन का करत नाही? भारतात ओबीसींना क्रिमिलियर लावल्यामुळे  झालेला दुष्परिणाम… याची माहिती दिली… ओबीसींना क्रिमिलियर लावल्यामुळे त्याचाच एक पुढील भाग म्हणून आज एससी आणि एसटीला शासन क्रिमिलियर लावू पाहत आहे…  असे भाटकर यांनी स्पष्ट केले… असंविधानिक कॉलेजिएम सिस्टीमद्वारे न्यायपालिका कशी बेबंद होत आहे…लोकांना संविधानिक पद्धतीने न्याय न देता अन्यायकारक वर्गीकरण करून सामाजिक आरक्षण कसे संपवले जात आहे? सामाजिक आरक्षण कसे मिळाले आणि ते कसे वाचवले पाहिजे. यावर अशोक भाटकर यांनी  प्रभावी, मुद्देसूद, सविस्तर आणि अभ्यासपूर्ण असे सखोल असे मार्गदर्शन केले…