Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडरायगड सम्राट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित घरगुती गणपती...

रायगड सम्राट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडगे तर उरण तालुकास्तरीय प्रथम क्रमांक हिरामण खुटले ठरले मानकरी…

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 


रायगड सम्राट प्रस्तुत व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था व आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला…शेकाप मध्यवर्ती कार्यालय आयोजित  या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे. एम म्हात्रे  यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली…
यावेळी माजी सभापती काशिनाथ पाटील जि प सदस्य विलास फडके  माजी सरपंच अशोक म्हात्रे माजी उपसभापती राजेश केणी चे म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते…

      यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोरेगाव सातारा येथील प्रतीक्षा अमोल घाडगे तृतीय क्रमांक बोरले चे दिलीप दत्तू पाटील तृतीय क्रमांक कामोठे दिपाली भरत माने चतुर्थ क्रमांक नांदगाव अशोक खुठले तर पाचवा क्रमांक दिनेश नाईक आसुडगाव यांना देण्यात आले तर  या स्पर्धेत सर्वात जास्त उरण पनवेल तालुकास्तरीय भाविकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला असून प्रथम क्रमांकाचे मानकरी तुरमाळे चे हिरामण शांताराम खुठले, द्वितीय क्रमांक गोवठणे उरण चे दीपक वसंत पाटील, तृतीय क्रमांक सावळे चे दिलीप म्हसकर, चतुर्थ क्रमांक मोठी जुई  चे जयदास कोळी पाचव्या क्रमांकाचे कुडावे  च्या प्राची संतोष ठोंबरे यांना देण्यात आला त्याचबरोबर प्रोत्साहनपर पारितोषिक श्रीधर पाटील आसुडगाव हातनोली एकनाथ मते, दापिवली मयूर भोईर रेवस दिनेश मनोरे नारपोली रोशन म्हस्कर, पिरकोन विनिकेत रमेश गावंड बामण डोंगरी चे विलास आंग्रे यांना देण्यात आले… 
      बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न शकलेल्या भाविकांना बक्षिसे  घरपोच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात  आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले… ज्येष्ठ पत्रकार  माधव पाटील ,ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे  ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दत्ता मोकल,असीम शेख समाजसेवक मंगेश अपराज आदी मान्यवरांच्या उपस्थित  हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला… यावेळी आमदार बाळाराम पाटील ,माजी नगरसेवक गणेश कडू यांनी रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले…त्याचबरोबर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला सलग तीन वर्षे उपक्रम राबवित असल्याने शुभेच्छा दिल्या…

 

  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments