अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-
भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा, केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेचे भाजपा प्रदेश सेलचे राज्य सहसंयोजक मा.श्री. दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ ह्यांच्या नियोजनानुसार अलिबाग तालुक्यांतर्गत ग्रामपंचायत रेवस येथे ‘आयुष्मान भारत’ ओळखपत्र नोंदणी शिबीर व बचतगटांमधील महिलांसाठी उद्यम आधार नोंदणी तसेच ‘द लाईफ फाउंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…
यावेळी रायगड जिल्ह्याचे समन्वयक अधिकारी श्री.शिलानंद इंगळे, सोशल वर्कर सौ.राखी राणे मॅडम,पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलमधील टीम मॅनेजर श्री.विजय बामणे, कर्मचारी कु.प्रिया साळवी, कु.निशा शिंदे,श्री.सागर पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.मच्छिन्द्र पाटील, सदस्य श्री.अजित पाटील,सदस्या सौ. शिला कोळी, ‘मन मित्र भवानी रेवस मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश कोळी, उपाध्यक्ष श्री. धर्मा कोळी, श्री.नवनाथ कोळी, श्री.अनंत कोळी, श्री.गजानन कोळी,श्री. विनायक कोळी, श्री.मंजित कोळी, श्री.ऋषभ कोळी, श्री.सचिन कोळी, श्री.विश्वास नाखवा तसेच भाजपा अलिबाग मंडल कार्यकारिणी उपाध्यक्ष सौ.मंगल ठाकूर हे उपस्थित होते.