उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
उरण तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीतील करंजा इंफ्रा कंपनीविरोधात स्थानिकांना काम मिळावे यासाठी स्थानिक लॉरी म्हणजेच ट्रक चालक मालक संघटना आक्रमक झाली होती…शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११;३० वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या गेट बाहेर ट्रक चालक मालक संघटनेने पत्रकारांसमक्ष आंदोलन केले…त्यानंतर कंपनीद्वारे जी कोळशाची वाहतूक होते… त्या वाहतुकीत ५०%भागीदारी स्थानिक ट्रक,डंपर चालकांना मिळावी अशी संघटनेची मागणी असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले …. याबाबत कोळसा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला अल्टिमेटम देण्यात आला आहे…कोळसा वाहतुकीत ५० % ट्रक स्थानिकांचे घेण्यात यावेत तशी भागीदारी स्थानिकांना मिळाली नाही तर सोमवार दि. ३० सप्टेंबर पासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे… बाहेरच्या गाड्या रोखल्या जातील असेही काही नेत्यांनी संतापून सांगितले….यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांच्यासह पंडीत घरत,माजी सभापती नरेशशेठ घरत,युवा नेते रमाकांत म्हात्रे कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले… आजच्या आंदोलनात ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत, उपाध्यक्ष सुहास घरत,पंडीत घरत, सुनील घरत,मिलिंद ठाकूर,माजी सभापती नरेश घरत,संकेत ठाकूर,सी.जी.घरत, रमाकांत म्हात्रे, बाळूशेठ घरत, प्रदिप पाटील आदींचा सहभाग होता…