रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील शेकडो शेतकरी संकटात सापडलेत…आस्मानी व वादळी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले आहे…येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले…मात्र 90 टक्के पेक्षा जास्त बियाणे खेड, काळी कचरी, भेळ असल्यामुळे पोंजे म्हणजेच पोकळ निघाले आहे…मोठ्या कष्टाने,आणि खर्चाने केलेली लागवड नुकसानीत गेलीय…हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलीय. तर कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे…