म्हसळा शिवसत्ता टाइम्स ( गणेश म्हाप्रळकर ):
मराठी मुलांना कंपनीत कमी लेखणे किंवा किंवा काढून टाकणे हे काय आता नवीन राहिलेले नाही…मात्र अशा विकृती करणाऱ्या व्यवस्थापक किंवा तेथील सबंधित अधिकाऱ्यांना मनसेने याआधी सुध्दा चांगलाच मनसे स्टाईलने प्रसाद दिलेला आहे…अशाच एका नामांकित कंपनीतील एक प्रकार समोर आला आहे.रायगडच्या पनवेल तळोजा येथील Daw chemical कंपनीमध्ये एका तरुण मुलाला कंपनीतून कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढून टाकले आहे…यानंतर या तरुणाला न्याय देण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसे सैनिकांसमवेत या कंपनीला भेट दिली…भेटीदरम्यान या प्रकाराचा जाब विचारला आणि येत्या काही दिवसात या तरुणाला कामावर रुजू न केल्यास कंपनीसमोर आंदोलन छेडू असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहणारी मनसे या तरुणाच्या मदतीला धावली आहे…