श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-
नवरात्री म्हटले की नऊ दिवस देवीसमोर गरबा नृत्य सादर केला जातो. कोकणात नवरात्रीला देखील गणपती सणा एवढेच विशेष महत्त्व आहे. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली विभागात नवरात्री उत्सवामध्ये लहान मुलांकडून वेगवेगळी प्रात्यक्षिक केली जातात. यामध्ये तलवारबाजी,दांडपट्टा,मल्लखांब,कुस्ती…असे वेगवेगळे खेळ मुलांकडून सादरीकरण केले जातात. हे खेळ पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळते असेच काहीसे खेळ बोर्ली विभागात शाळेतील विद्यार्थी करताना पाहायला मिळतात…