रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत ) :-
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जे एस डब्लू या नामांकित कंपनीकडून स्थानिक भूमीपुत्रांची वारंवार गळचेपी व अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करीत काराव गडब् ग्रामपंचायत कार्यकारणी व ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत. जे एस डब्लू आस्थापन व काराव ग्रामपंचायत कार्यकारणी यांच्यात झालेल्या चर्चे नुसार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, आयटीआय धारक विद्यार्थ्यांनी कंपनीच्या ऑनलाइन लिंकवर रजिस्टर करून व ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांची यादी देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. जे एस डब्लू कम्पनी च्या प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असुन गंभीर आजारांचा सामना गावकरी करतायेत, तसेच जे एस डब्लू कम्पणीने खाडीत टाकलेल्या पाईपामुळे मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ आलीय,नैसर्गिक नाल्यात भराव केल्याने पूरपरिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय. ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या काही सर्व्हेत ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन व बांधकाम बेकायदेशीर रित्या होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व सदस्यांनी केलाय. सदर मागण्या व तक्रारींची जलद सोडवणूक न झाल्यास जे एस डब्लू कम्पनी विरोधात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा काराव ग्रामस्थांनी दिलाय.