रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
येथील अलिबाग नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक २०२५ साठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी शनिवारी दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन दाखल केले. या वेळी संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले.
वॉर्ड क्रमांक ५-ब मधून समिर मधुकर ठाकूर (हुनी) व अभय म्हामुणकर यांनी तर वॉर्ड क्रमांक 7 मधून पक्षाच्या वतीने नामांकन अर्ज सादर केला. या सर्व उमेदवारांच्या पाठीशी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा ठाम पाठींबा असून, या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांत मोठी उत्सुकता दिसून आली.
या कार्यक्रमात काँग्रेसचे रायगड जिल्हा कार्यध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती विशेष ठरली. अलिबाग तालुक्यात काँग्रेस उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटप करण्यापासून ते उमेदवारांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यापर्यंत राजाभाऊ ठाकूर यांनी बजावलेली भूमिका अत्यंत प्रशंसनीय असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारांमध्ये आत्मविश्वास व उत्साह आणखी वाढला.
यावेळी उपस्थित राहून उमेदवारांना साथ देणाऱ्यांमध्ये शेकाप चे भाई जयंत पाटील, प्रशांत नाईक,अजित पवार गटाचे रवींद्र मधुकर ठाकूर, त्यांचे पत्नी नमिता ठाकूर तसेच काजल ठाकूर त्याचबरोबर उबाटाचे आमिर ठाकूर व त्यांचे असंख्य कार्यकर्ते सह काँग्रेसचे काका ठाकुर, रविना ठाकुर, सुनिल थळे (आप्पा), प्रभाकर राणे, रविंद्र ठाकुर, नमिता ठाकुर, जगदीश कवळे, प्रमोद पाटील, भास्कर भोपी व शैलेश घरत आदी मान्यवरांचा समावेश होता. संपूर्ण मिरवणुकीत घोषणाबाजी, ढोल-ताशांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अलिबाग नगरपरिषदेतील काँग्रेस-शेकाप आघाडी आगामी निवडणुकीत ताकदीने उतरणार असून, नागरिकांच्या विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

