खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खालापूर तालुक्याचे तहसीलदार बारा एक वाजेच्या घंट्यावर येत असतील तर नागरिकांची कामे कशी व कोण करणार?असा सवाल आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण यांनी उपस्थित केला आहे.खालापूर तालुक्यातील वाडी वस्ती,खेऱ्या पाड्यातील गावागावातून लोक प्रवास करून सकाळी लवकर तहसील कार्यालयात शासकीय कामाने येतात.काम लवकर झाले की नोकरी धंद्यावर जाण्याची अपेक्षा मनात ठेऊन देवाकडे प्रार्थना करतात. मात्र तहसील कार्यालयात लवकर आल्यावर माहिती मिळते की तहसीलदार साहेब बारा ते एक वाजता येतील अजून कोणतेच साहेब आले नाहित बसून राहा अशी उत्तरे मिळतात…त्यामुळे काम घेऊन आलेले नागरिक त्रस्त झाले आहेत… कार्यालयाच्या वरांड्यावर बसून नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे…
तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी तहसीलदार सह काही अधिकारी हे सकाळी दहा वाजता कार्यालयात हजर न होता दुपारी बारा ते एक वाजता कार्यालयात हजर होत असतील तर जनतेने त्यांची किती वाट बघायची ?असा प्रश्न आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण यांनी उपस्थित केला आहे…बारा एक वाजता कामावर येण्याचा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी रिवाज बनवला आहे का?दुपारी बारा वाजता अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतील तर त्यांनी त्याचा जबाब द्यावा…तालुक्यात जेवढे काही अधिकारी आहेत.. त्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी कार्यलयीन वेळ असताना ते १२ किंवा १ वाजता कार्यलयात हजेरी लावतात… हे कोणाच्या रामभरोसे चालत आहे का ?असा सवाल आता जनतेतून केला जात आहे…