नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामते गावातील गावठाणामध्ये झालेल्या बांधकामामुळे घराकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे व या संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे धामोते येथील ग्रामस्थ संजय गजानन विरले हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत…कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावातील राहणार संजय गजानन विरले यांच्या लेखी तक्रारी अनुषंगाने गटविकास पंचायत समिती कर्जत यांचे ५ जानेवारी २०२४ रोजीचे पत्र तर कोल्हारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पाण्याच्या टाकीच्या बाजूने रस्ता देण्याबाबत दिलेले पत्र, त्यानुसार २७ जून २०२४ रोजीचे व २९ सप्टेंबर २०२४ रोजीचे गटविकास अधिकारी यांचे पत्रानुसार कारवाई होत नसल्याने, सदर पाण्याच्या टाकीच्या बाजुने रस्ता देण्याबाबत दिलेले पत्रानुसार कोल्हारे ग्रामपंचायतीने ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या स्तरावरून कारवाई होत नसल्याने, आपल्या न्याय हक्कासाठी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी संविधान मार्गाने कोल्हारे ग्रामपंचायत हदीतील साई मंदिर येथील चार फाटा येथे संबंधीत दोषी असलेल्या ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या विरोधात प्रशासन स्तरावरून १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये कोल्हारे ग्रामपंचायतीने ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या स्तरावरून पाण्याच्या टाकीच्या बाजुने रस्ता देण्यात येईल या पत्रानुसार योग्य ती उचित कारवाई होत नसल्याने उपोषणकर्ते संजय गजानन विरले हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत…
सरपंच महेश विरले यांनी बोलताना सांगितले की,संजय विरले यांनी रस्त्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती… मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रानुसार पाण्याचे टाकीच्या उत्तरेच्या बाजुने रस्ता खुला व काँक्रीटचा करून दिला आहे…पण विधवा अनुबाई शेळके यांना मंजूर झालेले घरकुला पाण्याचे टाकीचे बाजूची जागा दिली असल्याने, त्या विधवा महिलेवरती अन्याय होऊ नये हा विचार ग्रामपंचायत करीत आहे…