Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडदि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने 68...

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे);-

          दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या विद्यमाने दरवर्षी सालाबादप्रमाणे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदार तळे महाड येथे आयोजित करण्यात आला. भारतातील हजारो वर्ष खीतपत पडलेल्या दारीदऱ्यात जीवन जगत असलेल्या शोषित, पीडित, बहुजन समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 विजया दशमी या दिवशी नागपूर या पवित्र ठिकाणी बौद्ध धम्माची दिक्षा देऊन माणूस म्हणून जगण्याचा नैतिक अधिकार दिला 22 प्रतिज्ञा देऊन माझा नवा जन्म होत आहे. असे संबोधित करून समानतेचा व मानवतेचा धम्म दिला अशा पवित्र मंगल दिनी आनंदाचा सोहळा साजरा करण्यात आला प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.  आलेल्या मान्यवरांचे स्वागत, बौद्ध पुजापाठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे वाचन, व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व या विषयावर मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते महिला वर्ग, समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते.. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments