नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंखे):-
दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी पेण पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळी एका वयोवृध्द महिलेची सोनसाखळी खेचून दोन अज्ञात इसम पल्सर मोटारसायकलवरून पळून गेले आहेत ,अशी माहिती नियत्रंण कक्ष अलिबाग यांचे कडून नेरळ पोलीस प्रशासनास प्राप्त झाली होती… सदर इसम नेरळ बाजूकडे येत आहेत अशी माहिती फ़ोन वरून देण्यात आल्यानुसार नेरळ हद्दीतून ज्या ठिकाणाहून इसम पास होवू शकतात त्या एकूण ५ ठिकाणी तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी नाकाबंदीचे आदेश दिले… दरम्यान सदर इसम नेरळ – बदलापूरच्या मुख्य रस्त्याने न जाता कच्च्या रोडने आंबवली रेल्वे गेट मार्गे जाणाऱ्या कोल्हारे फाटा येथून येत असताना नाकाबंदी करिता साध्या वेशात असलेल्या पोलिसांना दिसले… गुन्हे प्रकटीकरण नेरळचे पोहवा/ २३८४ वाघमारे, पोशी/ १८३६ केकान, पोशी/ ३०५ दवणे, पोशी/ १४१५ वांगणेकर तेथे उपस्थित होते… पोलीस असल्याची चाहूल लागताच चोरटे गाडी जोरात पळवू लागले… त्यावेळी नाकाबंदीच्या टीमने पाठलाग करुन अतिशय शिताफीने बुलेट गाडी आडवी लावली… व चोरट्यांना धरले… कैलास कमल बहाद्दूर नेपाळी वय-२४ वर्ष, गुलाम अब्बास ईराणी वय-२४ वर्ष राहणार नेरळ खांडा अशी त्यांची नावे आहेत… चोरी करताना जी पल्सर गाडी वापरण्यात आली आहे ती देखील चोरीची आहे… आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून अंदाजे १० ग्रॅम वजनाची चैन मिळाली… यापैकी एका अरोपीवर अनेक राज्यात चोरी केल्याचे व परराज्यात शस्त्र बाळगल्याचे गुन्हे नोंद आहेत…