खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
भाजपचे खारघर शहराचे पदाधिकारी रमेश खडकर यांनी भाजी विक्री करणाऱ्या पुरुषाला व महिलेला मारहाण केली आहे… आरोपीने व त्याच्या मुलांनी तसेच इतर दहा ते पंधरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजी विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण केली… याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात किरण अण्णासाहेब गीते वय वर्ष ३६ राहणार स्वन विहार सोसायटी सेक्टर १२ खारघर यांनी तक्रार दिली आहे… मारहाण करणारे आरोपी फरारी असून पोलिसांनी राजकीय दबावाखाली किरण गीते यांना १६८ प्रमाणे नोटीस बजवली आहे…त्यामुळे आचार्य व्यक्त होत असून या अन्यायाविरोधात खारघर पोलीस ठाण्याबाहेर लोकांनी ठिय्या आंदोलन केले…आरोपींवर भा. दं. वि ११८,११५(२),३५२,१८९(१),(२),(४),१९१(२)(३),१९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…