बालपणाचा खून थांबवा पालकांचा दबाव आणि शाळा व्यवस्थेचा अत्याचार…

0
5

खारघर शिवसत्ता टाईम्स (वार्ताहर):-

ऐका! आज मी बोलणार आहे त्या भयंकर सत्यावर लहान मुलांचं बालपण हरवतंय!
हो, लहान मुलं जी देवाचं रूप आहेत,जी निर्मळ कलाकृती आहेत त्यांच्यावर चालत आहे अघोरी अत्याचार!पालकांचा स्वार्थी दबाव, जो त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचा ओझा मुलांच्या खांद्यावर टाकतो हेच खरं अत्याचार आहे!आई-बाबांना स्वतःचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही कलेक्टर व्हायचं होतं, मोठा ऑफिसर होण्याचं स्वप्न होतं… पूर्ण नाही झालं, आणि आता तेच मुलांमध्ये शोधत आहेत!
स्वतःचे स्वप्न मुलांवर लादणं हेच मुलांवर चाललेलं अत्याचार आहे!
शालेय विभागाने CBSC अभ्यासक्रम वाढवला आहे, समाजाच्या अपेक्षांमुळे पालकांचा दबाव वाढतोय, आणि तो दबाव थेट मुलांवर टाकला जातो.या अभ्यासक्रमामुळे लहान मुलांचं स्ट्रेस, ताण वाढतोय; झोप पूर्ण न झाल्यामुळे, मुलांची काळजी घेतली नाही म्हणून मुलं आजारी पडत आहेत.
मुंबई, पनवेल, पुण्यात दवाखान्यात कितीतरी मुलं ऍडमिट होत आहेत, त्यांना antibotic औषधं घ्यावी लागत आहेत, आणि त्यामुळं किडनीवर त्रास होत आहे. मुलं मरत आहेत!तुम्ही या भिकार स्पर्धा आणि मार्कमुळे मुलांचं आरोग्य नीट जपत नाही, यासाठी पालक जबाबदार आहेत.
2019 मध्ये WHO (World Health Organisation) ने आकडा दिला आहे की 5-10 वर्षांतील वयोगटातील 7 लाख 40 हजार मुलं दरवर्षी निमोनियामध्ये मरत आहेत!शाळा व्यवस्थेची ही पद्धत – जिथे पालकांना शिकवायला लागलेलं ताण मुलांवर ओतलं जातं, जिथे स्पर्धा, मार्क्स, सर्टिफिकेट्स आणि शाळेची प्रतिष्ठा मुलांच्या आनंदापेक्षा महत्त्वाची ठरते – हे अत्याचाराचं सगळ्यात भयंकर रूप आहे.
सकाळ-सकाळ त्या कोवळ्या जीवाला उठवून school व्हॅन, रिक्षा मध्ये मुलं बकऱ्यासारखी कोंबतात.तीन-तीन भाषा, ट्युशनवर ट्युशन, गृहपाठाचा डोंगर, स्पर्धा – हे मुलं शिकत आहेत की कोणत्या गुन्हाची शिक्षा भोगत आहेत?सकाळी झोप पूर्ण नाही, तरी बळजबरी शाळेत ढकललं जातं; दिवसभर अभ्यास, गृहपाठ, ट्युशन – ही मुलं आहेत की यंत्र?
तुम्ही म्हणता –  भविष्यासाठी! भविष्य नाही! तुम्ही बालपण, आनंद आणि आरोग्य हिरावून घेत आहात!बालपण नावाच्या सुंदर गोष्टीचा तुम्ही खून करत आहात, देवाच्या निर्मळ प्रतिकृतीचा तुम्ही विनाश करत आहात.हे सर्व पाप आहे, आणि त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल.
अरे थांबा! बालपण हिरावून घेऊन तुम्ही देवाचं रूप असलेल्या मुलांचं नाश करताय!
त्यांना खेळायला, हसायला, मोकळं श्वास घ्यायला द्या.अन्यथा तुम्ही स्वतःच तुमच्या मुलांच्या बालपणाचा खून करत आहात!शालेय शिक्षण मंत्री यावर लवकर काहीतरी करायला हवं.
शाळा व्यवस्था, अभ्यासक्रम, पालकांचा दबाव ह्या अत्याचाराला आता थांबवणं गरजेचं आहे!
मुलं मशीन नाहीत मुलं देवाचं रूप आहेत!