महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड शहर हे ऐतिहासिक नगरी असून या शहरातील मुख्य रस्त्याविषयी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर शेती करायची का ?असा सवाल करीत गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची तातडीने डागबुजी करा असा इशारा महाड शहर मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे…
महाड शहर ही ऐतिहासिक नगरी असून शहरातील मुख्य रस्त्यांचे अंतर्गत रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वच रस्त्यांवर महाडमध्ये खड्डे पडले या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांसहित रिक्षा चालकांना देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे मागील आठ दिवसांपूर्वी देखील महाड रिक्षा चालक-मालक संघटनेने महाड शहरातील पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करून देखील त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे…
हे सगळे खड्डे तुम्ही गणेशोत्सवाच्या आधी भरून दिले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी महाडमध्ये आंदोलन घेण्याचा इशारा दिला आहे…