Sunday, November 24, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमतांचा जोगवा मागण्यांसाठी महायुतीकडून भूमिपूजनांचा सपाटा...मतदारसंघात छाप पाडण्यासाठी करंजा भूमिपूजनाचा घाट...

मतांचा जोगवा मागण्यांसाठी महायुतीकडून भूमिपूजनांचा सपाटा…मतदारसंघात छाप पाडण्यासाठी करंजा भूमिपूजनाचा घाट…

  उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):- 

                उरण विधानसभा निवडणुकीत मतदारांना भुलविण्यासाठी महायुतीकडून उद्घाटन व भूमीपूजनाचा घाट सुरू आहे…करंजा रेवस पुलाचा भूमिपूजन करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडी याबाबत कोमात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी उरण शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अनेक लोकार्पण सोहळा संपन्न झाला…परंतु त्यातील एकही आजतागायत वापरात आलेले नाही…तसेच काल नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छोटे विमान उडवून दिखावापण सत्ताधारी पक्षाने केला होता…मात्र विधानसभा निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागण्यांसाठी दि बा पाटील यांच्या नावाचा वापर केला जातो, परंतु नामकरण सत्ता घेऊन तीन वर्षे होऊनही करता आले नाही.
       रविवारी उलवा नोडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते…. त्यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात छाप पाडण्यासाठी करंजा रेवस पुलाचेही भूमिपूजन करण्याचा घाट केला. त्यासाठी  सकाळपासून सरकारी यंत्रणा व अधिकारी वर्ग कामाला लागून करंजा येथे फेऱ्या मारून पाहणी केली… याबाबत उरणमधील महाविकास आघाडी व त्यांचे घटक पक्ष, नेतेमंडळी हे मात्र याबाबत कोणताच आवाज अथवा विरोध करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे… 
          काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्याआधी करंजा रेवस पुलासाठी कोणताही भूसंपादन अथवा टेंडर नसताना रविवारी उद्धघाटनचा  घाट घालून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे…यावरून महायुतीला उरणमध्ये पराभवाची भीती वाटत असल्यानेच पूर्णत्वास न गेलेल्या कामांचे उद्घाटन करून मतांचा जोगवा मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे…तर महाविकास आघाडीतील काही इच्छुक उमेदवार परदेशवारीत मग्न आहेत…तर काहींना याचे देणंघेणं पडलेले दिसत नाही..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments