अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-
डोलवी येथील जे. एस. डब्ल्यु कंपनीचे दूषित सांडपाणी धरमतर खाडीत सोडले जात असून त्यामुळे खाडी प्रदूषित होत असल्याची तक्रार माजी आमदार पंडित पाटील यांनी आज रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. कंपनीतून निघणारा धूर आणि धूळ यामुळे वातावरण प्रदूषित झालय. खाडीत सुरू असलेल्या खोदकामामुळे भविष्यात बांध बंदिस्तीला धोका निर्माण होण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केलीय…कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्तेदेखील खराब झाल्याची पाटील यांची तक्रार आहे…