रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले…आणि त्या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षाने आपापली मोर्चेबांधणी सुरु केली आहे…रायगड जिल्ह्यात महायुतीतमध्ये आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे…कारण श्रीवर्धन मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे…खुद पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे…रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे श्रीवर्धन मतदारसंघ निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले… यावेळी माझी सगळ्या बाजूने निवडणूक लढण्यास तयारी आहे… श्रीवर्धन मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे…अशातच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व आताच्या बाल विकास मंत्री अदिती तटकरे आहेत…मात्र आता त्यांच्याच मतदारसंघावरती शिंदे गटाने दावा केल्याने चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळते…