उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे…अशातच उरण तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे…शिवसेना नेते, दिवंगत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली 2008 साली उरणमध्ये सेझविरोधात आंदोलन झाले होते…त्या आंदोलनात मनोहर भोईर सहभागी झाले होते… त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी या प्रकरणात आज मनोहर भोईर ऐन निवडणुकीच्या काळात अटक केली आहे…काल या केसची सुनावणी होती…ती सुनावणी झाली नाही…सुनावणी आधीच नवी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे …व त्यांच्यावर भा.दं.वि 143, 147, 145, 149, 324, 323, 332, 333, 353, 427 गुन्हे दाखल केले आहेत… निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने हा रडीचा डाव खेळला असल्याची चर्चा सध्या उरण तालुक्यात सुरु आहे…