उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे…महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे…तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे…महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय…गुरुवार दि.17 ऑक्टोबर रोजी मातोश्रीवर उपस्थित असलेल्या 13 विद्यमान आमदारांची उमेदवारांची तसेच आणखी 6 जणांची उमेदवारी निश्चित मानली जाते…असे सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटाच्या 19 जणांची उमेदवारी निश्चित झालीय. तर 3 विद्यमान आमदारांना या बैठकीचे निमंत्रण दिले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी थोडी अनिश्चित मानली जाते…निश्चित झालेल्या यादीमध्ये उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नावाचा समावेश आहे…उरणमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मनोहरशेठ भोईर लढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे…त्यामुळे उरणवर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचाच आवाज घुमणार आहे…हे वृत्त समजताच ठाकरे गटाकडून उरणमध्ये एकच जल्लोष साजरा केला जात आहे…