महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक सत्याग्रह केलेल्या पवित्र चवदार तळ्याजवळील जुन्या आंब्याच्या झाडाची फांदी अचानक तुटून खाली पडली. तळ्यावर नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पर्यटक उपस्थित असतानाही, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही… घटनेनंतर पर्यटकांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील अपदा मित्र अमिताभ जाधव आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडाच्या फांदीचे तुकडे बाजूला केले… त्यामुळे तळ्यावर आलेल्या पर्यटकांसाठी पुन्हा सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला.महाडच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाशी निगडित असलेल्या चवदार तळ्याला दररोज अनेक पर्यटक भेट देतात. त्यामुळे ही घटना सुदैवाने किरकोळ ठरली…