वशेणी-पिरकोन रस्त्यावर अज्ञात इसमाचा मृतदेह…घात की अपघात?पोलीस संभ्रमात … 

0
93

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-  

उरण तालुक्यातील वशेणी-पिरकोण रस्त्यावर या अगोदर अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आले. त्याची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सदर महिला व पुरुष जातीच्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींना जेरबंद केले आहे… त्यातच सोमवार दि. 21ऑक्टोबर रोजी सारडे गावाजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोलीस तातडीने तैनात करुन अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे व परिसरातील जागेचे पंचनामे सुरू केले आहेत… घटनेचा पुढील तपास उरण पोलीस  स्टेशन करीत आहेत.