लागा तयारीला…आता जिंकेपर्यंत लढायचे… पनवेल विधानसभा मतदारसंघातून शिरीषदादा…

0
105

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघातून कोण उमेदवार ?… गेले काही दिवस चर्चेत असलेल्या या प्रश्नाचे उत्तर शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी मिळाले…ही उमेदवारी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांना मिळाली आहे…शुक्रवारी मातोश्री येथून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांचे थेट आदेश  खारघर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सायंकाळी आले…या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत पनवेल विधानसभा-१८८ या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत…                  लागा तयारीला..आता जिंकेपर्यंत लढायचे… असा जयघोष करून शिवसैनिकांनी सायंकाळी खारघर शिवसेना कार्यालयाबाहेर फटक्यांची आतिषबाजी केली…शिरीषदादांना उमेदवारी मिळाल्याचा आनंद शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे साजरा करण्यात येणार आहे… त्यानिमिताने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व शिवसेना  पदाधिकारी, सर्व महिला आघाडी पदाधिकारी, सर्व युवासेना व युवतीसेना पदाधिकारी, शिवसेना आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे…