उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत मनोहरशेठ भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला… जोरदार शक्तिप्रदर्शन करीत वाजतगाजत अर्ज दाखल केला… मशाल धगधगणार,महाराष्ट्र जिंकणार…आता थकायचे नाही,भगवा फडकेपर्यंत थांबायचे नाही…अशी गर्जना करीत यावेळी प्रत्येक उमेदवाराने शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाची खात्रीही व्यक्त केली…महाविकास आघाडीतर्फे मोठे शक्तिप्रदर्शन करीत ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे सुपूर्द केला…यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उद्धव कदम, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील उपस्थित होते…
मनोहर भोईर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढतीत माजी आमदार विवेक पाटील यांचा ८०० मतांनी पराभव केला होता…काँग्रेसचे महेंद्र घरत हे तिसऱ्या आणि भाजपचे महेश बालदी हे चौथ्या क्रमांकाला होते… त्यानंतर २०१९ मध्ये महेश बालदी यांनी युतीसोबत बंदोखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते अपक्ष म्हणून पाच हजार मतांनी निवडून आले होते. सोमवारी सकाळी जसखार येथील रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन करत मनोहर भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला… यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते…