अलिबागेत दिलीप भोईर उर्फ छोटमशेठचे जोरदार शक्ती प्रदर्शन…छोटमशेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है..अलिबाग दणाणले … 

0
114

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :- 

विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अलिबाग – मुरुड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरलेले दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला…भोईर हे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत…8 महिन्यांपूर्वी त्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला…विधानसभा निवडणुकीचे तिकीट भाजपामधून मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती…परंतु अलिबाग-मुरुडची जागा महायुतीमधून शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना मिळाली…त्यामुळे दिलीप भोईर यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज भरला…
यावेळी लिबागमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढण्यात आली.या रॅलीत भोईर समर्थक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते…भोईर यांच्या समर्थनात जोरदार घोषणा देण्यात आली…दिलीप भोईर यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे जोगळेकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला…त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेले…यावेळी दिलीप भोईर त्यांची पत्नी सौ.दर्शना भोईर ,परशुराम म्हात्रे आदी समर्थक सोबत होते…