कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-
वसुबारसाचा मुहूर्त साधत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन सावंत वाजतगाजत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय…यापूर्वी
प्रचंड जल्लोष आणि उदंड उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली…विधानसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार करण्यात आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी होणार अशी घोषणा करण्यात आली…कर्जतमध्ये काल सकाळपासून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले… चौकाचौकात शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकत होता…प्रत्येकाच्या हाती धगधगती मशाल होती…
उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर नितीन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली की, यावेळी मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केला आहे…या ठिकाणी सर्वांचे मनापासून आभार मानतो…तुम्ही एक दिवस मला दिलाय अजून दहा दिवस मला द्या…मला काम करायचंय गाववाडी वस्तीवर जायचंय त्यानंतर येणारी पाच वर्ष तुमची सावली म्हणून मी उभा राहीन. तुमच्या घराचा तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून प्रेम मला नेहमीच दिलेत ते आजपर्यंत तुम्ही दाखवून दिलेत.ते काम पाच वर्षे मी प्रामाणिकपणे करेल. तसेच रोजगाराचा प्रश्न असेल रुग्णालयाचा प्रश्न असेल प्रत्येकवेळी माझ्या मतदारसंघातील जनतेला मुंबईला जावे लागते. आजही पाण्याचा प्रश्न कायम तसाच आहे. ग्रंथालय नाही त्यासाठी या मतदारसंघात काम करावे लागेल… ते मी करेन …असा विश्वास नितीन सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिला…
नितीन सावंत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत सहाहजार कार्यकर्ते तसेच सुरेश टोकरे, संजय गवळी,कर्जत तालुक्याचे अध्यक्ष उत्तम कोळंबे ,खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, महिला पदाधिकारी युवासैनिक आधी उपस्थित होते…उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला कोणताही गालबोट लागू नये यासाठी कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे, यांच्यासह कर्जत माथेरान, खोपोली, खालापूर,येथील पोलीस अधिकारी, 75 कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता…