प्रत्येक सैनिक एक पणती दीपोत्सव २०२४ चे आयोजन…लक्ष्य फाउंडेशनचा अभिनव उपक्रम…

0
100

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-

सालाबाद प्रमाणे यंदाही लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने ‘प्रत्येक सैनिक एक पणती’ हा अभिनव व अनोखा दीपोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे…
भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘प्रत्येक सैनिक एक पणती’ हा अभिनव उपक्रम साजरा करणार असल्याची माहिती लक्ष्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली…. यंदाचे हे रसायनीकरांचे १० वे वर्ष आहे… सामाजिक बांधिलकी जपत पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या अल्काईल अमाईन्स केमिकल लि.आणि प्रेरणा संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता अल्काईल अमाइन्स कॉलनी, मोहोपाडा येथे संपन्न झाला… जवळपास ५०० पणत्या लावून आपण ही कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थितांनी दिली… जागरुक भारतीय नागरिक या नात्याने आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली होती… कार्यक्रमस्थळी पणत्या उपलब्ध असतील आपण स्वतःआणल्या तरी चालतील असेही आवाहन शेवटी आयोजकांमार्फत करण्यात आले आहे…