देशी कट्टा बाळगणारा तरुण ताब्यात…स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाची कारवाई …

0
84

शिवसत्ता टाइम्स रसायनी (आनंद पवार) :-

महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली आहे… निवडणुकीच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील पोलीस ॲक्शन मोडवर आहेत…
एक २३ वर्षीय सौरभ जगदीश प्रसाद आर्या रा.रिस-मोहोपाडा ता.खालापुर हा खालापूर तालुक्यातील चौक गावच्या हद्दीत जुना मुंबई पुणे रोड लगत असलेल्या हॉटेल तेजस पार्किंगमध्ये एक देशी बनावटीचे सिंगल बोअर कट्टा व दोन जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर यांच्या पथकाने त्याच्यावर झडप घालुन त्याच्याकडील एक देशी बनावटीचे सिंगल बोअर कट्टा अंदाजे ३५,०००/रुपये किंमतीचे व १०००/ रुपये किंमतीच्या दोन जिवंत काडतुसांसह सौरभ जगदीश प्रसाद आर्या याला ताब्यात घेतले… त्याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं.४४८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम (३७)(१)(अ)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील,संदीप पाटील,पोलीस हवालदार यशवंत झेमसे,रवींद्र मुंडे, विकास खैरनार,सचिन शेलार,भरत तांदळे, सचिन वावेकर,यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर,पोलीस हवालदार रवींद्र मुंडे करीत आहेत…