उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
नवी मुंबईतील उलवे नोड येथील जावळे गावातील किराणा मालाच्या दुकानात सिलेंडर स्फोट झालाय…त्यात ज्वलनशील पेट्रोलचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण करून आगीचे लोट आणि भडका एक ते दोन किलोमीटर अंतरावर पसरले होते…त्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे…दिपावलीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि.३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली…आग एवढी भीषण होती की उलवे नोड परिसरात धुराचे लोट पसरले होते…अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली…आगीत जखमी झालेल्या रुग्णांना नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले…उलवे नोड विकसित होत असताना एकही पेट्रोल/डिजेल/सीएनजी पंप नाही ही शोकांतिकाच आहे…याचा फायदा उलवे नोडमधील व्यापारी वर्ग घेत असुन ज्वलनशील पदार्थाचा साठा करून दामदुप्पट विकत आहेत…यात प्रशासनाचे आर्थिक साटेलोटे असल्याचे खात्रीलायक वृत्त असून सदर घटनेस प्रशासन जबाबदार असल्याचे उलवे नोडमधील नागरिक व्यक्त करीत आहेत… या घटनेचा पुढील तपास उलवे पोलीस स्टेशन करीत आहेत…