खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
खारघर बेलपाडा रस्त्यावर गॅरेजराज सुरू आहे.रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथवर गॅरेजवाले बिनधास्त धंदा करतायत. रस्ता,पदपथ, फुटपाथ सगळं व्यापलं गेलंय.पादचारी असोत वा वाहनधारक सर्वजण हैराण झालेत. सकाळ-संध्याकाळ ऑफिसला जाणारे लोक वाहतूक कोंडीत अडकतात.टायर बदलणे,तेल टाकणे,गाड्यांची दुरुस्ती ही सगळी कामं सरळ रस्त्यावर सुरू असतात. त्यामुळे रस्त्याचा अर्धा भाग बंद पडतो आणि गाड्या तासन्तास अडकतात.
स्थानिक नागरिक सांगतात की या मागे एक मोठा म्होरक्या आहे.त्याच्या आशीर्वादानेच हा गॅरेजराज सुरू आहे. प्रशासन कधी येऊन कारवाई करतं, पण गॅरेजवाले दंड भरून पुन्हा उभे राहतात. त्यामुळे कारवाई म्हणजे फक्त नाटक.पोलिस प्रशासन मात्र झोपेत आहे का?असा प्रश्न थेट लोक विचारतायत.रोजचा त्रास,धूळ-धूर, कोंडी,गोंधळ हे सगळं सहन करायचं नागरिकांनी आणि धंदा करायचा गॅरेजवाल्यांनी?खारघरकरांचा थेट सवाल रस्ते आमच्यासाठी की गॅरेजवाल्यांसाठी? गॅरेज माफियांना आवर घालणार कोण?नागरिकांची मागणी एकच गुंडाराज थांबवा,गॅरेजराज संपवा आणि बेलपाडा रस्ता मोकळा करा…