दि.बा.पाटील नावाशिवाय विमानतळ सुरूच होणार नाही शिवसेनेची गर्जना… मागण्या मान्य करा, नाहीतर विमानतळ पेटेल शिवसैनिकांचा इशारा…

0
1

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याच्या मागणीसाठी आज पनवेलहून विमानतळाच्या दिशेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विराट कार रॅली निघाली. हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांच्या गजरात हा मोर्चा विमानतळ परिसरात पोहोचला.

मात्र विमानतळ परिसरात पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. शिष्टमंडळ सीईओ कॅप्टन शर्मा यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, सीईओ कामात व्यस्त आहेत म्हणून थेट भेट नाकारण्यात आली.यामुळे संतप्त शिवसैनिकांनी निवेदन न देता संतापाचा उद्रेक केला आणि परतले.जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढील काळात रस्त्यावर अधिक मोठं आंदोलन उभं राहील…असा इशारा देत शिवसैनिकांनी संघर्ष पेटवला आहे…

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने साहेब, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, तालुकाप्रमुख महेंद्र गायकर, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संतोष ठाकूर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, प्रदीप केणी, गुरु म्हात्रे, सदानंद शिर्के, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ. दिपश्री पोटफोडे, सौ. सुवर्णा जोशी, उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटक सौ. अनिता डांगरकर, महानगर संघटक सौ. लीना गरड, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, विधानसभा अधिकारी अजय पाटील यांचं सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.