अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा रस्त्यावर बुधवारी पैसाच पैसा पसरलेला होता… या पैशांचा मालक कोण? हे समजले नाही मात्र यावेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची दिवाळी झाली… अवघ्या काही सेकंदात हजारो रुपये घेऊन वाटसरू पसार झाले…काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना…कर्जत येथील एक्साइज् कार्यालयाची महिला कर्मचारी रस्त्यावरून जात असताना ही बाब तिच्या निदर्शास आली… तिला देखील अडीच हजार रुपये मिळाले… ही रक्कम या तरुणीने अलिबाग पोलीस स्टेशनच्या मार्शल बिटकडे सुपूर्द केली…
अलिबाग जवळील गोंधळपाडा रस्त्यावर दुपारी तुरळक रहदारी सुरू असते… अचानक या रस्त्यावर पाचशे रुपयांच्या नोटा पसरलेल्या वाटसरूंना दिसून आल्या… प्रत्यक्षदर्शिंच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या नोटांची मोठी रक्कम होती… या नोटा रस्त्यावरून जाणाऱ्यांनी हातोहात लंपास केल्या….
दरम्यान रस्त्यावर पडलेल्या या नोटा निवडणुकीसाठी वापरल्या जाणार होत्या की अन्य कुठल्या सामान्य माणसाची ही वर्षाची कमाई होती याबाबत चर्चा आहे… एखाद्याच्या पिशवीतून ही रक्कम पडली असावी, दिवाळीचा पगार किंवा कामगारांचा बोनस असू शकतो… त्यामुळे ज्यांना कोणाला ही रक्कम मिळाली आहे… त्यांनी अलिबाग पोलिसांकडे ही रक्कम सुपूर्द करून माणुसकी दाखवावी असे आवाहन बजुर्ग नागरिकांनी केले आहे…