इंदापूर शिवसत्ता टाइम्स (गौतम जाधव):-
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात आले असून माणगाव तालुक्यातील उमेद विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनात मोठी वाढ करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून काम सुरु आहे तसेच दिवाळी सणाच्या निमित्ताने मागील वर्षी “दिवाळी एकाच ठिकाणी” ही संकल्पना राबविली गेली होती. यामध्ये दिवाळी फराळ, उटणे, मोती साबण, मावळे, किल्ले, पणती, आकाश कंदील, अगरबत्ती, अशी उत्कृष्ट प्याकिंग व लेबलिंग करून ते लोकांपर्यंत पोहचविण्यात आले होते तसेच या वर्षी वस्तूचे मार्केटिंग व मागणी एक महिन्यापासून सुरु असून तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, तहसील कार्यालय, तसेच स्वीटमार्ट कंपनी, पुणे, मुंबई, येथून देखील चांगला प्रतिसाद व मागणी येत असून त्याच्या वेळेत मागणीनुसार पुरवठा करण्यात देखील आला असता अशाच प्रकारे गोरेगाव, निजामपूर, मोर्बा, तळाशेत, माणगाव पंचायत समिती या ठिकाणी विक्रीचे स्टॉल लावण्यात आले असून दरवर्षी पेक्षा यावर्षी ६ ते ७ लाखाच्या वर उलाढाल झाल्याचे हिरकणी उत्पादक समूहाच्या देविका पाबेकर यांनी माहिती देताना सांगितले.
यावर्षी “पहिली मागणी लगेच पुरवठा” या संकल्पनेनुसार दिवाळी फराळाची विक्री करण्यात आली. व ते यशस्वी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी प्रियदर्शनी मोरे तसेच गटविकास अधिकारी संदीप जठार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे…हिरकणी दिवाळी फराळ उपक्रम व प्रदर्शनाचे नियोजन तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष माणगाव पंचायत समितीतर्फे करण्यात आले. यावेळी तालुका व्यवस्थापक समीर चांदे, रवींद्र शिंदे, प्रभाग समन्वयक स्वप्नील गोसावी,वर्षा ईनामदार, संजय राठोड, अक्षता डवले, यांच्या बरोबर सर्व समुदाय संसाधन व्यक्ती (सी. आर. पी) यांनी यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली आहे.