उरण शिवसत्ता टाईम्स (प्रवीन पाटील):-
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुनील जी तटकरे यांचा वाढदिवस निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता जेएनपीए टाऊनशिप हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे, असे उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सौ. कुंदा ठाकूर आणि शहर अध्यक्ष परिक्षित ठाकूर यांनी सांगितले.
सदर स्पर्धेत एकूण १० भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये कोप्रोली येथील श्री विश्वविजयनाथ सुहास संगीत विद्यालय, चिचंवली येथील श्री राम प्रासादिक भजन मंडळ, भाताण पाडा येथील शिवशक्ती भजन मंडळ, खालापूर येथील ओमसाई भजन मंडळ, तळोजे येथील श्री सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ, देसाई येथील जय गणेश प्रासादिक महिला भजन मंडळ, दुंदरे पाडा येथील आई एकविरा महिला भजन मंडळ, करंजाडे येथील श्री त्रिमूर्ती प्रासादिक भजन मंडळ, अंबरनाथ येथील विश्वनाथ महिला भजन मंडळ, आणि सांताक्रूझ येथील आई भवानी प्रासादिक भजन मंडळ यांनी भाग घेतला आहे.
स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक रूपये २१,०००/- आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रूपये १५,०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रूपये ११,०००/- सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रूपये ५,०००/- व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच, उत्कृष्ट पखवाज वादक आणि गायक यांचा स्वतंत्र गौरव रुपये ३,०००/- आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, हा भजन स्पर्धा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केला जाणार आहे. आयोजकांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा उद्देश धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन देणे तसेच महिला प्रतिभांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित राहणार असून, स्पर्धेत सहभाग घेतलेल्या मंडळांना प्रोत्साहन देण्यात येईल.
सौ. कुंदा ठाकूर आणि परिक्षित ठाकूर यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस निमित्त आयोजित हा कार्यक्रम स्थानिक सांस्कृतिक व धार्मिक चैतन्य वृद्धिंगत करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.